ETV Bharat / state

दुकानाचे अर्धे शटर सुरू ठेवत व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचा केला विरोध

सांगलीतील व्यापाऱ्यांनी अर्धे शटर सुरू ठेवत निर्बंधाचा विरोध केला आहे. मात्र, महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. महापालिकाकेडून व्यापाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाई सहन केली जाणार नाही, असा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.

गर्दी
गर्दी
author img

By

Published : Jul 8, 2021, 3:43 PM IST

Updated : Jul 8, 2021, 3:54 PM IST

सांगली - सांगलीतील व्यापाऱ्यांनी निर्बंधाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारपासून (दि. 8 जुलै) शहरातील व्यापार सुरू करण्याचा निर्धार करत अनेक व्यापाऱ्यांनी अर्धे दुकान उघडे ठेवत व्यापार सुरू केला आहे. तर दुसऱ्याबाजूला पालिकेकडून कारवाई मोहीम सुरू केली आहे. मात्र, व्यापारी महासंघाने कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

बोलताना व्यापारी महासंघाचे नेते अतुल शाह

व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका

सांगली जिल्ह्यामध्ये 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू झाले. त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलत देण्यात आली होती. मात्र, पॉझिटिव्हिटी दरानुसार पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्ष्या जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश शासनाच्या चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी आहे. 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता तर इतर दुकानांवर निर्बंध आहेत. मात्र, सातत्याने निर्माण होणाऱ्या निर्बंधांविरोधात महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकान सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

पालिकेकडून कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही

प्रशासनाचे निर्बंध झुगारून गुरुवारपासून सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेत दुकाने सुरू केली आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली दुकाने उघडण्यात आली आहेत. अर्धे शटर उघडून व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्यावतीने रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केला आहे. तर व्यापारी महासंघाचे नेते अतुल शाह यांनी पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - तासगावातील कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक

Last Updated : Jul 8, 2021, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.