ETV Bharat / state

उसाच्या ट्रॉलीने घेतला पेट - Sangli Latest News

पलूस तालुक्यातील नागठाणे येथे अंकलखोप मार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही प्रमाणात ऊस जळला आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे.

उसाच्या ट्रॉलीने घेतला पेट
उसाच्या ट्रॉलीने घेतला पेट
author img

By

Published : Feb 26, 2021, 8:46 PM IST

सांगली - पलूस तालुक्यातील नागठाणे येथे अंकलखोप मार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतिही जीवितहानी झाली नसून, काही प्रमाणात ऊस जळला आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत तारेला ट्रॉलीचा स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे.

चालत्या उसाच्या ट्रॉलीने घेतला पेट

अंकलखोप मार्गावर चालत्या उसाच्या ट्रॉलीने पेट घेतला. वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्यासाठी उसाची वाहतूक या ट्रॉलीमधून होत होती. ट्रॉलीने पेट घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी चालकाला दिली, त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेण्यात आले. तोपर्यंत आग भडकली होती.

उसाच्या ट्रॉलीने घेतला पेट

अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण

दरम्यान या आगीबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, आणि उसाच्या दोन्ही ट्रॉलींना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.