ETV Bharat / state

पाण्यासाठी दुष्काळग्रस्त मंत्रालयावर धडकणार, जत ते मुबंई पायी दिंडीला सुरूवात

शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता मात्र, तो सत्यात उतरू शकला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी खासदार संजयकाका पाटील यांनी वंचित गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना तयार केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मंजुरी दिली. पण, प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार याबाबत दुष्काळग्रस्तांमध्ये साशंकता आहे.

author img

By

Published : Jun 8, 2019, 1:40 PM IST

अध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी रवाना

सांगली - येथील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या ४६ गावांनी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावर धडक देण्यासाठी पायी दिंडी काढली आहे. कालपासून या पायी दिंडीला सुरूवात झाली. पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढल्याशिवाय माघार घेणार नाही, असे सांगत थेट सरकारच्या दारात जाण्याची भूमिका या दुष्काळग्रस्तांनी घेतली आहे.

पाण्यासाठी दुष्काळग्रस्त मंत्रालयावर धडकणार, जत ते मुबंई पायी दिंडीला सुरूवात

सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग असणाऱ्या दुष्काळी जत तालुक्यात यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जवळपास शंभर टँकर तालुक्यात पाणी पुरवठा करत आहेत. तर म्हैसाळ सिंचन योजनेतून तालुक्यात थोड्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे. मात्र, पूर्व भागातील ४६ गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. या ठिकाणी कोणतीही योजना पोहोचू शकली नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता मात्र, तो सत्यात उतरू शकला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी खासदार संजयकाका पाटील यांनी वंचित गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना तयार केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मंजुरी दिली. पण, प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार याबाबत दुष्काळग्रस्तांमध्ये साशंकता आहे.

त्यामुळे जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली 46 गावांनी पाण्यासाठी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. तालुक्यातील संख येथून या पायी दिंडीला काल सकाळी सुरुवात झाली आहे. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशेहून अधिक दुष्काळग्रस्त या दिंडीत सहभागी झाले. असंगी, गुड्डापूर, सोरडी, वळसंग मार्गे दुपारी जत मध्ये पोहचली आहे.

यावेळी जतचे तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. जो पर्यंत सरकारकडून कायमस्वरूपी या वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेत मंत्रालयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाणार, असा निर्धार तुकाराम बाबा महाराज आणि दुष्काळग्रस्तांनी यावेळी व्यक्त केला. पाण्यासाठी निघालेल्या या दिंडीमध्ये तालुक्यातील भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जतमध्ये स्वागत करत दिंडीला पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी सकाळी कवठेमहांकाळ, सांगली मार्गे ही पायी दिंडी मुंबईकडे रवाना होणार असून, 20 जून रोजी ही दिंडी मुंबईत दाखल होणार आहे.

Intro:
सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed send file name - MH_SNG_MANTRALAY_PAYIDINDI_07_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_MANTRALAY_PAYIDINDI_07_JUNE_2019_VIS_5_7203751

स्लग - पाण्यासाठी दुष्काळग्रस्त निघाले मंत्रालयाकडे..जत ते मुबंई पायीदिंडला सुरवात..

अँकर - पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावर धडक देण्यासाठी पायीदिंडी काढली आहे.दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या ४६ गावांनी आजपासून या पायीदिंडीला सुरूवात केली आहे.पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय माघार नाही,असा निर्धार करत आता थेट सरकारच्या दारात जाण्याची भूमिका घेतली आहे.Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग असणाऱ्या दुष्काळी जत तालुक्यात यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.जवळपास शंभर एक टॅंकर तालुक्यात सध्या पाणी पुरवठा करत आहेत.तर म्हैसाळ सिंचन योजनेतून तालुक्यात थोड्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे.मात्र पूर्व भागातील ४६ गावं आजी पाण्यापासून वंचित आहेत. या ठिकाणी कोणतीही योजना पोहोचू शकली नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता मात्र सत्यात उतरू शकला नाही तर निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी खासदार संजयकाका पाटील यांनी वचिंत गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना तयार केली आहे।याला।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटुता मंजुरी सुद्धा दिली आहे प्रत्यक्षात पानि कधि मिळणार याबाबत दुष्काळग्रस्तांच्या मध्ये सशंकता आहे.त्यामुळे जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली 46 गावांनी पाण्यासाठी आता आरपारची लढाई सुरू केला आहे. पाणी मिळावे यासाठी आज पासून थेट मंत्रालया पर्यंत पायी दिंडीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील संख येथुन या पायीदिंडीला सकाळी सुरुवात झाली आहे.तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशेहून अधिक दुष्काळग्रस्त या दिंडीत सहभागी झाले होते.असंगी ,गुड्डापुर, सोरडी, वळसंग मार्गे दुपारी जत मध्ये पोहचली आहे.यावेळी जत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
जो पर्यंत सरकारकडून कायमस्वरूपी या वंचित गावांच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढत नाही.तो पर्यंत माघार घेणार नाही.अशी भूमिका घेत मंत्रालयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाणार असा निर्धार तुकाराम बाबा महाराज आणि दुष्काळग्रस्तांनी यावेळी व्यक्त केला. तर पाण्यासाठी निघालेल्या या दिंडीमध्ये तालुक्यातील भाजपासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जत मध्ये स्वागत करत दिंडीला पाठिंबा दर्शवला आहे.
शनिवारी सकाळी कवठेमहांकाळ , सांगली मार्गे ही पायी दिंडी मुंबईकडे रवाना होणार असून ,20 जून रोजी ही पायीदिंडि मुंबईत दाखल होणार आहे.

बाईट - तुकाराम बाबा महाराज - अध्यात्मिक गुरू, जत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.