सांगली - मित्रांच्या समवेत पार्टीमध्ये दारू पिल्यानंतर तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून पडून एका तरुणचा जागीच मृत्यू झाला आहे. मिरजेतील पंढरपूर रोडवरील असणाऱ्या बंद पडलेल्या शोरूमच्या इमारतीवरून पडल्याने ही घटना घडली आहे. अक्षय माने असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील रहिवाशी होता.
नशेच्या अवस्थेमध्ये तोल गेला - मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी येथे राहणारा अक्षय माने व त्याचा मित्रांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास मिरज पंढरपूर रोडवरील डीएसके टोयाटो शोरूमच्या टेरेसवर पार्टी केली. या इमारतीच्या सुरक्षा रक्षक असणाऱ्या अक्षय माने याच्या मित्राने पार्टीचे नियोजन केले होते. पार्टी सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी दारू घेतली. त्यानंतर नशेच्या अवस्थेमध्ये अक्षय माने हा घरी जाण्यासाठी निघाला आणि तो खाली उतरत असताना त्याचा तोल गेला तसाच तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला.
पुढील तपास सुरू आहे - अचानक घडलेल्या या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी जखमी अवस्थेतील अक्षय माने याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, अक्षयचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद