सांगली - सांगली महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. तसेच कामगारांनी अधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध नोंदवत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
सांगली महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत कर्मचार्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबतीत येत्या दहा दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा सफाई कर्मचारी बेमुदत संपावर जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार राहील,असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या आहेत मागण्या
- बदली व मानधन वरील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये अगाऊ रक्कम देण्यात यावे
- प्रत्येक बदली व मानधनावरील कर्मचाऱ्याला महिन्यातून किमान 26 दिवस काम उपलब्ध करुन देण्यात यावे
- पालिका प्रशासनाच्या वतीने कायम कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे बदली व मानधनावरील कर्मचाऱ्यांना साहित्य पुरविण्यात यावे
- पालिका कामगार, अधिकाऱ्यांची तातडीने बदली करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी आणि योग्य पात्रतेच्या कामगार अधिकाऱ्याची नेमणूक करावी
हेही वाचा - राहुल गांधींना मारहाण प्रकरण : टायर पेटवून आंदोलन करत सांगलीत युवक काँग्रेसने नोंदवला निषेध