ETV Bharat / state

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर, सांगली-कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम - स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन

कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर रोडवरील उदगाव याठिकाणी चक्काजाम करण्यात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

कृषी कायद्या विरोधात स्वाभिमानी रस्त्यावर

author img

By

Published : Nov 5, 2020, 3:36 PM IST

सांगली- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात देशभर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या उदगाव या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. माजी खासदार आणि संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कृषी विषयक धोरणांंसंबंधी केंद्र सरकारने अध्यादेश मंजूर केलेले आहेत. ते शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारे असून उद्योगपतीधार्जिन असल्याचा आरोप करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर

एक रकमी एफआरपी आणि दोनशे रुपये अधिक दर मिळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आलेली आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कृषी आंदोलनाला प्रादेशिक आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न-

केंद्राच्या विधेयकावरून बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधयेकांवरून भाजपवर निशाणा साधला. या कृषीविधेयाविरोधातील आंदोलनाला भाजपाकडून प्रादेशिक आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ पंजाबच्या शेतकऱ्यांचा आणि शीख धर्मीयांचे आंदोलन आहे, असा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आता शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतील 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी देशातील सर्व शेतकरी दिल्लीत एकत्र येतील आणि केंद्राच्या आंदोलन करणार असल्याचे, राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

अर्णब गोस्वामी वरून भाजपावर टीका-

देशभरात अर्णब गोस्वामी समर्थनात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरून राजू शेट्टींनी भाजपावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाजपाला वेळ नाही. मात्र त्यांची तळी उचलून धरणाऱ्या संपादकाला वाचवण्यासाठी वेळ आहे, अशी टीका करत एका महिलेच्या पत्नी आणि सासूने आत्महत्या केली तिचे दुःख भाजपाला दिसत नाही. मात्र एका संपादकाचा दुःख या लोकांना दिसते, असा टोलाही राजू शेट्टींनी भाजपला लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.