ETV Bharat / state

ऊस दरावरुन स्वाभिमानी संघटना आक्रमक,  ऊसाची वाहतूक करणारी ४० वाहने रोखली - sangli

ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन छेडले आहे. रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक बंद पाडण्यात येत आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांकडून रात्रीच्या सुमारास ऊस वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विटा नजीकच्या उदगीरी साखर कारखाण्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक रोखली.

स्वाभिमानीने ऊस वाहतूक करणारी ४० वाहने रोखली
author img

By

Published : Nov 20, 2019, 12:12 AM IST

सांगली- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पलूसच्या अंकलखोप येथे ऊस वाहतूक करणारे ४० वाहने रोखली होती. यावेळी ऊस वाहतूकदार आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. अखेर स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेनंतर ऊस वाहतूकदार संघटनेने दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट केले.

माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता

ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन छेडले आहे. रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक बंद पाडण्यात येत आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांकडून रात्रीच्या सुमारास ऊस वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विटा नजीकच्या उदगीरी साखर कारखाण्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक रोखली. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे ऊसाने भरलेले सुमारे ४० ट्रॅकटर रोखून धरण्यात आले व घोषणा देत ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी आणि ऊस वाहतूकदार यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. मात्र, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ऊस वाहतूकदारांनी ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. जो पर्यंत एफआरपीचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा- सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक

Intro:
File name - mh_sng_03_uas_andolan_vis_01_7203751 - to -mh_sng_03_uas_andolan_vis_01_7203751

स्लग - ऊस वाहतूक करणारे 40 वाहने रोखली,स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेनंतर ऊस वाहतूक न करण्याचा वाहतुकदारांचा निर्णय ..

अँकर - सांगलीत ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पलूसच्या अंकलखोप येथे ऊस वाहतूक करणारे 40 वाहने रोखली होती.यावेळी ऊस वाहतुकदार आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यां मध्ये वादावादीचा प्रकार घडला.अखेर स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेनंतर ऊस वाहतुकदार संघटनेने दराचा प्रश्न सुटल्या शिवाय ऊस वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट केले.Body:ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात आंदोलन छेडले आहे.रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक बंद पाडण्यात येत आहे.तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानादारांच्याकडून रात्रीच्या सुमारास ऊस वाहतूक करण्यात येत आहे.त्यामुळे मंगळवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विटा नजीकच्या उदगीरी शुगर कारखाण्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक रोखली.पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे ऊसाने भरलेले सुमारे 40 ट्रॅकटर रोखून धरण्यात आले,घोषणा देत यावेळी ऊस वाहतूक बंद पाडली.यावेळी स्वाभिमानी आणि ऊस वाहतूकदार यांच्यात वादावादीचा प्रकार घडला.मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ऊस वाहतूकदारांनी ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली यावेळी हे आंदोलन करत ,जो पर्यंत एफआरपीचा तोडगा निघत नाही.तो पर्यंत एकाही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.