सांगली - एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे कार्यालय पेटवण्यात आले आहे. घोगाव येथील सबऑफिस कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांचा हा क्रांती कारखाना आहे.
स्वाभिमानीचा एफआरपीसाठी एल्गार...
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपी दिली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.
एफआरपी आंदोलनाची ठिणगी भडकली; क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवले - एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन २ महिने उलटले. मात्र, ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीची रक्कम दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिले आहे..