ETV Bharat / state

येलूर येथे झालेल्या खुनातील संशयित आरोपींना अटक - संशयित आरोपींना अटक sangli

या खून प्रकरणी कुरळप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काटे आणि त्यांच्या पथकाने सखोल तपास करत अखेर फोन डिटेल्स आणि सायबर क्राईमच्या मदतीने नागेश आणि अजय यांना कोल्हापूर जिल्ह्यातील मोरेवाडी येथून ताब्यात घेतले.

sangli
येलूर येथे झालेल्या खुनातील संशयित आरोपींना अटक
author img

By

Published : Jan 21, 2020, 5:08 AM IST

सांगली - वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ 16 जानेवारीला सनबीम कंपनीजवळच्या नंबरचा मळा येथील शेतातील वस्तीवर सुनील प्रकाश काळे (वय 35) याचा तोंडावर व हातावर विळा आणि दगडाने घाव घालून खून केला होता. याप्रकरणी खून करून पसार झालेल्या संशयित आरोपींना मंगळवारी कुरळप पोलिसांनी अटक केली आहे. नागेश उर्फ मिथुन मारुती काळे (वय 27 रा.येलूर) आणि अजय सुरेश बिलुगडे (वय 25 रा. मोरेवाडी. कोल्हापूर ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

येलूर येथे झालेल्या खुनातील संशयित आरोपींना अटक

हेही वाचा - 'मॉर्निंग वॉक'साठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

या खून प्रकरणी कुरळप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काटे आणि त्यांच्या पथकाने सखोल तपास करत अखेर फोन डिटेल्स आणि सायबर क्राईमच्या मदतीने नागेश आणि अजय यांना कोल्हापूर जिल्ह्यातील मोरेवाडी येथून ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की नागेश हा मृत सुनील याचा चुलत भाऊ असून नागेशला पत्नी आणि सुनीलमध्ये अनैतिक संबधं असल्याचा संशय होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वादही झाले होते. यावरून नागेशने पत्नीला माहेरी पाठवले होते.

हेही वाचा - देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या मुस्लीम वीर जवानाची आई २० वर्षांपासून 'अंधारात'

16 जानेवारीला नागेश हा आजारी असल्याने कोडोली येथील खाजगी दवाखान्यात भरती झाला होता. त्याला भेटण्यासाठी मोरेवाडी येथील मित्र अजय गेला असता नागेशने तब्येत ठीक असल्याचे सांगून दनाखान्यातून डिस्चार्ज घेतला. दोघेही मोटारसाइकलवरून नातेवाईकांच्या घरी जेवण करून येलूर गावी आले. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान फाट्यावरील शेतात गेले असता तेथे सुनील हा आपल्या मोटारसायकलवरून जनावरांना वैरण घेऊन शेडजवळ येताच दोघांमध्ये जुन्या भांडणावरून शाब्दिक वाद होऊन भांडण विकोपाला गेले. आधीच पत्नीच्या कारणाने राग मनात असल्याने सुनीलच्या हातातील विळा घेऊन मित्राच्या सोबतीने सुनीलवर सपासप वार केले. सुनिल खाली पडताच शेजारी पडलेला दगडाने तोंडावर वार करून खून केल्याचे कबूल केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरविंद काटे यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद काटे करीत आहेत.

Intro:Body:.Conclusion:स्लग,, येलूर येथील खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यात कुरळप पोलिसांना यश.
अँकर,, सांगली.वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ 16जानेवारी रोजी सनबीम कंपनीच्या दक्षिण बाजूस नंबरचा मळा येथील शेतातील वस्तीवर विळा व दगडाने तोंडावर व हातावर वर्मी वार करून खून करून पसार झालेल्या आरोपीना आज कुरळप पोलिसांनी घेतले ताब्यात..
विवो,, नागेश उर्फ मिथुन मारुती काळे व अजय सुरेश बिलुगडे. अशी संशयित आरोपींची नावे असून.मागील चार दिवसापूर्वी येलूर येथील. सुनील प्रकाश काळे वय 35याचा पुणे बेंगलोर राष्ट्रीय माहमार्गावरील.येलूर फाट्या नजीक शेतातील शेडजवळ विळा व दगडाचा वापर करून. खून करण्यात आला होता तेव्हा पासून कुरळप पोलीस स्टेशनचे. पोलीस निरीक्षक अरविंद काटे व त्यांची टीम अहोरात्र प्रयत्न करीत होती.अखेर फोन डिटेल्स व सायबर क्राईमच्या मदतीने.नागेश उर्फ मिथुन मारुती काळे वय 27 रा.येलूर व अजय सुरेश बिलुगडे वय 25रा. मोरेवाडी.कोल्हापूर यांना कोल्हापूर जिल्ह्यातील मोरेवाडी येथून ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की.नागेश हा मयत सुनील याचा चुलत भाऊ असून नागेशला. पत्नी व सुनील मध्ये अनैतिक संबधं असल्याचा बऱ्याच दिवसापासून संशय होता.यावरून अनेकदा त्याच्यात वाद ही झाले होते. यावरून नागेशने पत्नीला माहेरी वास्तव्यास पाठवले आहे. 16जानेवारी रोजी नागेश हा आजारी असल्याने. कोडोली येथील खाजगी हौस्पिटल मध्ये ऍडमिट होता.त्याला भेटण्यासाठी मोरेवाडी येथील मित्र अजय हा हौस्पिटल मध्ये गेला असता. नागेशने तब्बेत ठीक असल्याचे सांगून डिस्चार्ज घेऊन. दोघे ही मोटारसाइकलवरून नातेवाईक यांच्याघरी जेवन करून येलूर गावी आले.आणि पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान फाट्यावरील शेतांत गेला असता. तेथे सुनील हा आपल्या मोटारसायकलवरून जनावरांना वैरण घेऊन शेड जवळ येताच. दोघांमध्ये जुन्या भांडणावरून शाब्दिक वाद होऊन भांडण विकोपाला गेले. आणि आधीच पत्नीच्या कारणाने राग मनात असल्याने.सुनीलच्या हातातील विळा घेऊन मित्राच्या सोबतीने सुनीलवर सपासप वार केले.आणि खाली पडताच शेजारी पडलेला दगड घेऊन. तोंडावर वार करून खून केल्याचे कबूल केलेअसल्याचे स.पो.नि.अरविंद काटे यांनी सांगितले.याकामी पो.ना.अनिल पाटील.पो.ना.भूषण महाडिक.पो.ना.बाजीराव भोसले.पो.को.शरद पाटील सचिन मोरे. सहभाग घेऊन आरोपीना ताब्यात घेतले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.