सांगली - महाराष्ट्राची हास्य जत्रा नाही, राज्याचे मंत्री आहात तुम्ही, अश्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीका ( Supriya Sule Slams Chandrakant Patil ) केली आहे. राज्यातल्या विनाअनूदानित शाळेतल्या शिक्षकांना देखील पगार देणाऱ्या घोषणेवरून खासदार सुळे ( Nationalist Congress MP Supriya Sule ) यांनी ही टीका केली आहे, सांगलीच्या साखराळे येथे त्या बोलत होत्या.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका : भाजपाचे ज्येष्ठ नेते उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातल्या विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांना देखील सरकारच्या वतीने पगार देण्यात येईल,असे जाहीर केले आहे.यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.खासदार सुळे म्हणाल्या एका मंत्री जेंव्हा बोलतो तेंव्हा त्याला लाईटली घ्यायचे नसते, चेष्टावारी करायची नाही, गंमत जमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. ही महाराष्ट्रची हास्य जत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात, तुम्ही भाषण करताना विचार करून बोला, अश्या शब्दात खडे बोल सुनावले आहेत. इस्लामपुरच्या साखराळे येथे "एक तास राष्ट्रवादी"साठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
तसेच इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची. शक्य अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायचे आहे कारण वक्तव्य त्यांनी केल आहे. मात्र जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खाजगी कॉलेजच्या शिक्षकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का ? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का ? असा सवाल करत उठ सुठ महाराष्ट्रातील मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, अश्या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.