ETV Bharat / state

Bullock Cart Racing Sangli : बैलगाडी शर्यतीला परवानगी; सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण - Maharashtra bullock cart game

सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर बैलगाडी शर्यतीला ( supreme court allow bullock cart racing ) सशर्त परवानगी मिळालेली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातल्या ( Sangli Maharashtra On bullock cart case ) शेतकरी व शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला आहे. आपल्यासाठी आजचा दिवस सोनेरी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी ( Sangli Maharashtra Farmers On bullock cart race ) व्यक्त केली.

bullock cart racing Social worker Vijay Jadhav
सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव
author img

By

Published : Dec 16, 2021, 5:35 PM IST

Updated : Dec 17, 2021, 4:47 PM IST

सांगली - सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर बैलगाडी शर्यतीला ( supreme court allow bullock cart racing in maharashtra ) सशर्त परवानगी मिळालेली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी व शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला आहे. आपल्यासाठी आजचा दिवस सोनेरी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बैलगाडी शर्यतीसाठी वारंवार आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांना न्यायालयाच्या निकालानंतर अश्रू अनावर झाले.

हेही वाचा - Leena Nair Sangali Connection : सांगलीचे वॉलचंद कॉलेज मधून लीना नायर यांनी घेतले शिक्षण

शर्यत परवानगीचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली. या निकालाचे शेतकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. बैलगाडी शर्यती ठेवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वारंवार आंदोलने करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना याच्यासह अनेक राजकीय पक्षांनी देखील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील काही महिन्यांपूर्वी बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी एक मोठे आंदोलन राज्यभर उभारले होते आणि आता या बैलगाडी शर्यतीला अखेर महाराष्ट्रात सशर्त परवानगी मिळाल्याने सर्व शेतकरी वर्गातून प्रचंड आनंद व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव

परवानगी मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी या मागणीसाठी सांगलीतल्या साखराळे येथील बैलप्रेमी असणारे विजय जाधव यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंदाश्रू अनावर झाले. जाधव यांनी बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी या मागणीसाठी आतापर्यंत तीन वेळा सांगली ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा, बैलगाडी घेऊन पदयात्रा, काढली होती. अनेक वेळा बैलगाड्यांच्या शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन देखील जाधव यांनी केले होते. तर, बैलगाडी शर्यतीला जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा प्रण देखील जाधव यांनी केला होता आणि तो आजही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्यासाठी सोन्याचा दिवस ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत जाधव यांनी बैलांसोबत गुलाल उधळून बैलगाडी शर्यत परवानगीचे स्वागत केले. तसेच, या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक सधनता वाढेल असा विश्वासही व्यक्त केला.

बैलगाडी शर्यत परवानगी, ऐतिहासिक विजय

रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी, न्यायालयाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय ठरला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक बाबीवर चांगला परिणाम होणार आहे. बैलांना चांगले दर मिळणार आहे. त्या शिवाय बैलांचे पालन - पोषण आता अधिक चांगल्या पद्धतीने शेतकरी करतील आणि महाराष्ट्राची जिवंत परंपरा पुन्हा सुरू होईल, असा विश्वास अशोक माने यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - OBC Reservation : शकुनी काकामुळे आरक्षण मिळत नाही - आमदार पडळकर

Last Updated : Dec 17, 2021, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.