ETV Bharat / state

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी मिळवले आबांच्या पेक्षा अधिक मताधिक्य - sangli ncp news

सांगली जिल्ह्यातील तासगाव -कवठेमहांकाळ मतदारसंघातून सुमन आर आर पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी १ लाख २८ हजार ३७१ मत मिळवून विजय मिळवला.

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी मिळवले आबांच्या पेक्षा अधिक मताधिक्य
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:26 PM IST

सांगली - तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमन आर आर पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आर आर आबांचा गड कायम राखला आहे. प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचा त्यांनी पराभव केला आहे.

आबांचा गड राखत सुमन पाटलांनी राखला

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या निधनानंतर होणाऱ्या पाहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी विजय संपादन केला आहे. या मतदारसंघात त्यांना शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे आव्हान होते. घोरपडे यांच्या सोबतीला आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे तासगाव तालुक्याचे भाजप नेते व खासदार संजयकाका पाटील यांची मोठी ताकत होती. त्यामुळे ही निवडणूक अटी-तटीची झाली. कमी मताधिक्याने सुमनताई पाटील यांचा विजय होईल असे अंदाज व्यक्त करण्यात येते होते. मात्र, आर आर पाटील यांच्या आज पर्यंतच्या निवडणूकीत जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा अधिक मताधिक्याने या निवडणुकीत सुमनताई पाटील यांना मिळाले आहे. 1 लाख 28 हजार 371 तर अजितराव घोरपडे यांना 65 हजार 839 इतकी मते मिळाली आहेत. 62 हजार 532 इतक्या मताधिक्याने सुमनताई पाटील या विजयी झाल्या आहेत.

या निवडणुकीत प्रचाराची सर्व धुरा आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांभाळली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या भाषणांनी सभा गाजवत, मोठा विजय मिळवत रोहित पाटील यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवल्याची चर्चा सुरू आहे. या विजयानंतर रोहित पाटील याच्याशी बातचीत केली आहे, आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी .

Intro:

file name -
mh_sng_02_raju_tasgao_vidhansabha_vis_01_7203751

स्लग - आबांचा गड राखत सुमनताई पाटलांनी मिळवले आबांच्या पेक्षा अधिक मत्ताधिक्य..

अँकर - सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी मोठ्या मत्ताधीक्यांने विजय मिळवत आर आर आबांचा गड कायम राखला आहे.प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांचा त्यांनी पराभव केला आहे.

व्ही वो - राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या निधनानंतर होणाऱ्या पाहिल्याच सार्वत्रिक निवडणूकी मध्ये अपेक्षेप्रमाणे आर आर आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी विजय संपादन केला आहे.या मतदारसंघात त्यांना शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे आव्हान होते.तर घोरपडे यांच्या सोबतीला आर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे तासगाव तालुक्याचे भाजपा नेते व खासदार संजयकाका पाटील यांची मोठी ताकत होती.त्यामुळे ही निवडणूक अटी-तटीची झाली.कमी मत्ताधीक्याने सुमनताई पाटील यांचा विजय होईल असे अंदाज व्यक्त करण्यात येते होते.मात्र आर आर पाटील यांच्या आज पर्यंतच्या निवडणूकीत जेवढे मताधिक्य मिळाले, त्यापेक्षा अधिक मत्ताधिक्य या निवडणुकीत सुमनताई पाटील यांना मिळाले आहे.1 लाख 28 हजार 371 तर अजितराव घोरपडे यांना 65 हजार 839 इतकी मते मिळाली आहेत.आणि 62 हजार 532 इतक्या मत्ताधिक्याने सुमनताई पाटील या विजयी झाल्या आहेत.
या निवडणुकीत प्रचाराची सर्व धुरा आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांभाळली होती.आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या भाषणांनी सभा गाजवत, मोठा विजय मिळवत रोहित पाटील यांनी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवल्याची चर्चा सुरू आहे.या विजयानंतर रोहित पाटील याच्याशी बातचीत केली आहे.आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी .

Body:व्ही वो .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.