ETV Bharat / state

ऊसतोड उशिरा सुरु झाल्याने ऊसतोड कामगारांना आर्थिक फटका - Rajarambapu sugar factory news sangli

शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यातील एफआरपी दर लवकर न ठरल्याने चालू हंगाम २० दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे ऊसतोड कामगार विना कामाचा खोपटावर बसून राहिला आहे. त्यांनी सोबत आणलेले धान्य व रुपये संपल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

sangli
ऊसतोड कामगार
author img

By

Published : Dec 4, 2019, 9:07 AM IST

सांगली- एफआरपी दर व अवकाळी पावसामुळे राजारामबापू साखर कारखाना उशिरा सुरु झाला. मात्र, ऊस तोड कामगार आधिच जिल्ह्यात दाखल झाला होता. खारखाना सुरू होईपर्यंत ऊसतोड कामगार वीस दिवस बिनकामी राहिला. त्यामुळे, ऊस कामगार आर्थिक अडचणीत सापडला आहे.

प्रतिक्रिया देताना ऊसतोड कामगार

महाराष्ट्रामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्हा हा ऊस शेतीची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. दसरा संपल्या नंतर बीड, उस्मानाबाद सोलापूर, मोहोळ व इतर जिल्ह्यातील ऊस कामगार मोठ्या प्रमाणात आपली लहान मुलं-बाळं व जनावरे असा प्रपंच सोबत घेऊन तीन-चार महिने मिळेल त्या ठिकाणी सदर जिल्ह्यात वास्तव्य करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बाहेरील जिल्ह्यातून दिवाळी पूर्वीच आपला संसार घेऊन वाळवा तालुक्यातील कुरळप व परिसरातील गावांच्या शेतात झोपड्या बांधून राहिले.

परंतु, शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यातील एफआरपी दर लवकर न ठरल्याने चालू हंगाम २० दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे कामगार विना कामाचा खोपटावर बसून राहिला. त्यांनी सोबत आणलेले धान्य व रुपये संपल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. कारखाने उशिरा सुरू झाल्याने व आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आधीच अंगावर घेतलेली रक्कम कशी फिटणार, अशी चिंता उस तोड कामगारांना सतावत आहे.

हेही वाचा- सांगलीत मुकबधीर असोसिएशनच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मोर्चा

Intro:Body:.Conclusion:स्लग..कारखाना हंगाम उशिरा सुरु झाल्याने फडकऱ्यांचे आर्थिक नुकसान. वीस दिवस खोपटावर बसून.
अँकर..एफआरपी दर व अवकाळी पाऊसामुळे उशिरा कारखाने सुरु झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून आलेले ऊसतोड कामगार वीस दिवस बसून राहिल्याने अगोदरच अंगावर घेतलेली रक्कम कशी फिटणार या चिंतेत आहेत.
विवो,, महाराष्ट्रामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्हा हा ऊस शेतीची पंढरी म्हणून ओळखली जाते.विजया दशमी दसरा संपला कि कारखान्याचे धुराडे पेटतात आणि चाहूल लागते ती बीड.उस्मानाबाद सोलापूर मोहोळ व इतरही जिल्ह्यातून ऊस कामगार मोठ्या प्रमाणात आपली लहान सहान मुल बाळ व जनावरे असा प्रपंच सोबत घेऊन तीन चार महिने मिळेल त्या ठिकाणी वास्तव्यास येण्याची.एखादे छोटे गाव जरी असले तरी त्या गावच्या माळावर झोपड्या असल्याकी गाव कसे गजबजल्या सारखे वाटत असते.
चालू वर्षी ही राजाराम बापू साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बाहेरील जिल्ह्यातून दिवाळी पूर्वीच आपला संसार घेऊन वाळवा तालुक्यातील कुरळप व परिसरातील गावच्या माळरानावर व काहींच्या शेतात झोपड्या मारून राहिले आहेत. परंतु शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यातील एफआरपी दर लवकर न ठरल्याने चालू हंगाम वीस दिवस उशिरा सुरु झाला यामुळे कामगार विना कामाचा खोपटावर बसून राहिल्याने कामगारांनी सोबत आणलेले धान्य व रक्कम संपल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.कारखाने उशिरा सुरु झाल्याने आधीच अंगावर घेतलेली रक्कम कशी फिटणार या चिंतेत ऊस तोड कामगार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.