ETV Bharat / state

Sugarcane Ban Agitation : अन्यथा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवू... - Swabhimani Farmers Association

सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटण्याची ( Sugarcane agitation broke out in Sangli district ) शक्याता आहे. ऊसाच्या एकरकमी एफआरपीसह ( Sugarcane FRP ) विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ( Self respecting Farmers Association ) "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू ( Sugarcane cutting ban movement by farmers association ) झाले आहे.

Sugarcane Ban Movement
Sugarcane Ban Movement
author img

By

Published : Nov 17, 2022, 7:53 PM IST

सांगली - ऊसाच्या एकरकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ( Self respecting Farmers Association ) "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू ( Sugarcane cutting ban movement by farmers association ) झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दर आंदोलनाची तीव्रता ( Sugarcane price agitation in Sangli district ) वाढत आहे. ठीक-ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर, बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस आंदोलना भडका ( Sugarcane agitation broke out in Sangli district ) उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अन्यथा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवू...

ऊस तोडणी बंद - उसाला एक रकमी एफआरपी मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवनुक थांबवावे,त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयाच्या अधिकचा भाव द्याव, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 17, 18 नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली.

चार बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडली - वाळव्याच्या हुतात्मा साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. इस्लामपूर-वाळवा रोडवर चार बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखून धरली आहे. तर पलूस तालुक्यातल्या कुंडल या ठिकाणी संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली क्रांती साखर कारखान्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रॅक्टर धरले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कारखान्याचा गेट बंद केला. तसेच खानापूर तालुक्यात उदगिरी साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचे नेतृत्वाखाली बंद पाडली आहे, खानापूर येथे ट्रॅक्टरची हवा सोडून, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर पेटवून देण्याचा ईशारा - आंदोलनाबाबत जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले,ऊस उत्पादक शेतकरयांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरीसंघटनेकडून दोन दिवस "ऊस तोडणी बंद"आंदोलन सुरू करण्यात आले आहे.या आंदोलनाला जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी साखर कारखानदारांनी, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी वाहतूकदारांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र तरी देखील काही प्रमाणात ऊस वाहतूक व कारखाने सुरू आहेत. अशा कारखान्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धडक देऊन कारखाने बंद पाडण्यात येत आहेत. त्याचबरोबर जी ऊस वाहतूक सुरू आहे, ती देखील बंद पाडण्यात येत आहे. तरी देखील जबरदस्तीने उस वाहतूक तोडणे कारखाने सुरू राहणार असतील तर स्वाभिमानी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करेल. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात येतील,असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.