सांगली - जिल्ह्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून (बुधवार) 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या निर्बंधांना विरोध दर्शवत बाजारपेठेत रस्त्यावर ठिय्या मारत मानवी साखळी करून "भीक मागो"आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी पालिका रस्त्यावर -
सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ व इतर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा घरपोच करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तर आजपासून या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. पालिकेचे पथक रस्त्यावर उतरून कारवाई करत आहे.
सांगलीत कडक निर्बंधाची अंमलबजावणी सुरू.. तर व्यापाऱ्यांचे प्रशासनाविरोधात "भीक मांगो" आंदोलन
सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून (बुधवार) 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी या निर्बंधांना विरोध दर्शवत बाजारपेठेत रस्त्यावर ठिय्या मारत मानवी साखळी करून "भीक मागो" आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.