सांगली - घाटाच्या वळणावर असलेल्या दाट धुक्याच्या भीतीने ड्रायव्हर मध्यरात्री गाडी सोडून निघून गेला. गाडीत उधारीवर घेतलेला हजारोंचा भाजीपाला आणि त्याच गाडीत झोपलेली तीन लहान मुले. अशा परिस्थितीत 'तिने' जीवाची पर्वा न करता हातात थेट बोलेरो गाडीचा स्टेरिंग घेतले. आता मागील वीस वर्षांपासून त्या एका कसलेल्या ड्रायव्हरप्रमाणे गाडी चालवत आहे. तसेच भाजीपाला विकून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून सांगलीतील नकुसा म्हासाळ यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी आहे.
हेही वाचा... कलावंतांच्या दीपस्तंभाला अनेकांची श्रद्धांजली
आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पाहायला मिळत आहे. पण सांगलीच्या नकुसा म्हासाळ या महिलेची कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे. एखाद्या सामान्य महिलेचा संसार अर्ध्यात मोडल्यावर तिला आपल्या मुलाबाळांचे पालन-पोषण करण्यासाठी धुणे-भांडी किंवा रोजंदारीवर काम करावे लागतात. मात्र नकुसा यांनी अगदी वेगळा मार्ग पत्करला आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले.
हेही वाचा... डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप
सांगलीच्या शामराव नगर येथील महादेव कॉलनीत राहणाऱ्या नकुसा म्हासाळ या गेल्या वीस वर्षांपासून स्वतः बोलेरो मालवाहतूक गाडी चालवत थेट कोकणात जाऊन भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. वयाच्या अवघ्या 21 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरात छोट्या दोन मुली व एक मुलगा असा अर्ध्यावर मोडलेला संसार कसा चालवायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मग कुटुंबासाठी त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र यातून हातात फारसे काही लागत नसल्यामुळे मुलाबाळांचे शिक्षण आणि प्रपंचाच्या इतर गरजा भागवण्यासाठी त्यांनी परगावी जाऊन भाजीपाला विक्री करायचे ठरवले.
हेही वाचा... आज ठरणार जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींचे भवितव्य!
म्हासाळ यांना परगावी भाजीविक्री करण्यासाठी आवश्यकता होती, ती एका मालवाहतूक गाडीची. त्यांनी जमवलेल्या पुंजीतून एक जुनी बोलेरो गाडी विकत घेतली. मात्र गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर शोधावा लागला. नकुसा यांनी मग उधारीवर भाजीपाला खरेदी करून तो विकण्याचा व्यवसाय सुरू केला. एके दिवशी त्यांनी अशीच भाजीपाल्याची गाडी भरली आणि आपली तीन मुले गाडीत घेऊन कोकणातील राजापूरकडे निघाल्या. मात्र मध्यरात्री आंबा घाटाच्या माथ्यावर पोहचले असता घाटात धुके असल्याचे समजले.
हेही वाचा... सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळ्या घाला; केंद्रीय मंत्र्यांचा 'आदेश'!
तेव्हा ड्रायव्हरने धुक्यात घाट उतरणे अवघड असल्याचे सांगत नकुसा यांना गाडीच्या चाव्या देऊन तो निघून गेला. तेव्हा नकुसा यांना काही सुचनासे झाले. मात्र गाडीत दलालांकडून उधारीवर घेतलेला 30 हजार किंमतीचा भाजीपाला, त्याच गाडीत झोपलेली 3 लहान-लहान मुले होती. त्यातच सकाळी 8 पर्यंत बाजारात माल पोहचवणे आवश्यक होते. या विचारांनी नकुसा म्हासाळ यांनी शेवटी स्वतः गाडीला स्टार्टर मारला. त्या दिवशी त्यांनी ज्या आत्मविश्वासाने दाट धुके असतानाही घाट उतरला. तोच आत्मविश्वास घेऊन आज 20 वर्षांपासून त्या स्वतः गाडी चालवत आहेत. शिवाय आपला भाजीपाल्याचा व्यवसाय उत्तम प्रकारे करत आहेत. नकुसाबाई यांची ही जीवनकहाणी सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
हेही वाचा... नटसम्राट हरपला, श्रीराम लागूंचा रंगभूमीवरील जीवनप्रवास