सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करणारे भगतसिंह कोशारी हे पेशव्यांची औलाद असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी ( Sharad Koli on Governor Controversial Statement ) यांनी केली आहे.
राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यास राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,शिवाय त्यांचे जीभ हसडून हातात देऊ,असा इशारा देखील शरद कोळी यांनी दिला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तातडीने महाराष्ट्रातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी देखील शरद कोळी यांनी केली आहे.
2024 मध्ये भाजपचे सरकार येणार नाही - भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर शरद कोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 2024 मध्ये भाजपाचे सरकार येणार नसल्याने जातीय दंगली घडवण्यासाठी भाजपाकडून अशी वक्तव्य करण्यात येत असल्याचा आरोप शरद कोळी यांनी यावेळी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.