सांगली: जन्मदात्या आईचा एकुलत्या एक मुलाने दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार (son killed mother) सांगली जिल्ह्यात समोर आला आहे. (son killed mother in sangli). जत तालुक्यातील माडग्याळ नजीकच्या व्हसपेठ येथे ही घटना घडली आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे या दुर्दैवी मातेचा नाव असून या प्रकरणी मुलगा सुरेश कोरे याला जत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही: रविवारी दुपारच्या सुमारास हा निर्घृण खुनाचा प्रकार घडला. शांताबाई व त्यांचा मुलगा सुरेश यांच्यात काही कारणास्तव वाद घडला. त्यानंतर रागाच्या भरात सुरेशने आईच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर दगडांनी ठेचून खून केल्याचा प्रकार पोलीस तपासामध्ये उघड झाला. दरम्यान संशयित सुरेश याला जत पोलिसांनी ताब्यात घेतला असून नेमका खून कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत अधिक तपास जत पोलीस करत आहेत. या घटनेने जत तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.