सांगली - शहरातील कर्नाळ रोडवरील एका हॉटेल मध्ये हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी सांगली पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांनाही ताब्यात घेत सुटका केली आहे.
हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासर्वांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.