सांगली - कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भाऊजीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरामध्ये घडली ( Sisters husband brutally murdered ) आहे. जावेद गवंडी, वय वर्ष 45 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव ( Jawed Gawandi Murder Case ) आहे. बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून ( Murder Due to Family Dispute ) भावाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मेव्हण्यानेचं केला निर्घृण खून : सांगलीतल्या राजीव गांधी झोपडपट्टीमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कौटुंबिक वादातून निर्घृण खून करण्यात आला आहे. पोटात, मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करून हा खून करण्यात आला आहे. जावेद नूरमहंमद गवंडी (वय ४५) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सदरची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे पथकासह तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
बहिणाला होणाऱ्या त्रासातून केला खून : दरम्यान, गवंडी याचा मेहुणा तौफिक कुरणे यानेच त्याच्या भाऊजीकडून बहिणीला देण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार तातडीने तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी कुरणे यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गवंडी याच्यावर घरफोडी, जबरी चोरी यांसह १२ हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जावेद गवंडी हा पत्नी आणि एक मुलासह जुना बुधगाव रोडवरील राजीव गांधी झोपडपट्टीमधील पत्र्याच्या घरात राहतो. सध्या तो पेंटिंग काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. जावेद याची पत्नी जास्मिन हिच्याशी त्याचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून जावेद आणि तौफिक यांच्यामध्ये भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली आहे.
हेही वाचा : जेवण न दिल्याने मुलाने केली आईची हत्या, सांगलीतील धक्कादायक घटना