सांगली - मंजूर झालेले टेंभू योजनेचे पाणी द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सांगली पाधबंधारे विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी ताताडीने टेंभू योजनेचे उर्वरित काम सुरू करुन वंचित १२ गावांचा समावेश करावा यासाठी मोर्चा काढला. या वेळी मागण्या मान्य न झाल्यास २३ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला.
सांगली जील्ह्यातील आटपाडीमध्ये देशातील एकमेव बंदिस्त पाईपलाईन टेंभू योजनेचे काम मंजूर मिळूनही संथ गतीने सुरू आहे. या योजनेत आटपाडी तालुक्यातील १२ गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे आज श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आज सांगली पाटबंधारे कार्यालयावर धडक देण्यात आली. या योजनेच्या पूर्णत्वास पाठपुरावा करणारे श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड भारत पाटणकर, आटपाडीचे नेते आंनदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात दुष्काळग्रस्त व वंचित १२ गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना पाटणकर यांनी सरकारने वेळेत ही योजना पूर्ण केली असती तर सांगलीच्या आटपाडी आणि सोलापूरच्या सांगोला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली नसती. अत्यंत संथ गतीने देशातील एकमेव असणाऱ्या बंदीस्त पाईपलाईन योजनेचे काम सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारकडून ही योजना मंजूर आहे, त्यामुळे तातडीने काम सुरू करण्यात यावे. या योजने पासून वंचित असणाऱ्या १२ गावांचा समावेश करण्यात यावा. योजनेची तासगाव आणि सांगोला तालुक्यात आखणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी भारत पाटणकर यांनी केली आहे. १५ जुलैपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही तर, २३ जुलै पासून पाटबंधारे विभागाविरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.