सांगली - दुष्काळी भागातील माणूस कधी उपाशी मरणार नाही, कारण तो प्रचंड कष्ट करणारा आहे. एकत्रित कामाची अंमलबजावणी करण्याचे सूत्र राज्यातील शेतकऱ्यांसमोर येथील शेतकऱ्यांनी निर्माण केले आहे. त्यामुळे यशस्वी उत्पादन घेतले आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पवार पुढे म्हणाले, की डाळींब लावा हे आपण सर्व गावाला सांगत सुटलो, बारामतीमध्ये आपण ऊस लावला, एकदा ऊसाची लागण केली की बहुतांश लोक गावातील चौकात बसून देशाची चौकशी करतो, हे आम्हा ऊसवाल्यांचे काम, पण खानजोडवाडी मधील शेतकऱ्यांनी तसे केले नाही.
आपण ऊस कमी करून डाळींब केले, 3 वर्षाने तेल्या रोग आला आणि बाग गेली. बाग काढून टाकली. चौकशी करताना आढळले की, अनेक ठिकाणी तेल्याशिवाय बागा येतात आणि ते बागा कुठे घेतल्या जातात हे खानजोडवाडीमध्ये घेत असल्याचे समोर आलं, हे सर्व तुमच्या गावातील एकजुटीमुळे झाले आहे.