ETV Bharat / state

कोरोनाचा कहर...एकाच दिवसात ७५ कोरोना रुग्णांची वाढ; पालिका क्षेत्रातील ६८ जण - सांगली कोरोना केसेस

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी यामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात तब्बल ७५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ७७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली,असून यापैकी ४०५ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

sangli corona update
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 16, 2020, 6:57 AM IST

सांगली- जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ६८ जणांचा समावेश असून यामध्ये पालिकेच्या सावली बेघर केंद्रातील ५२ जणांचा समावेश आहे.दिवसभरात ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे सध्या ३५१ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या ७७९ झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी यामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात तब्बल ७५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसात आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ६८ जणांचा समावेश आहे.

७५ रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी १,पलूस तालुक्यातील - नागठाणे १ ,सांडगेवाडी १, कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बु १ , येतगाव १,तडसर १ ,शाळगाव १ आणि सांगली महापालिका क्षेत्रातील ६८ जणांचा समावेश असून यामध्ये सांगली शहरातील ६३ जण तर मिरज शहरातील ५ जण आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्या सांगली शहरातील सावली बेघर निवारा केंद्रतील ५१ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तर दुसरीकडे मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे ३० जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये पाठवण्यात आले आहे.

बुधवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोना मुक्त,यामुळे जिल्ह्यातील ३५१ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ७७९ कोरोना रुग्णांची नोंद झाली,असून यापैकी ४०५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. २३ जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.