ETV Bharat / state

Schoolboy death in Sangli : जेसीबीखाली चिरडून शाळकरी मुलगा ठार

author img

By

Published : Mar 16, 2022, 4:21 PM IST

जेसीबीच्या चाकाखाली येऊन हर्षवर्धनचे डोके फुटून हा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात ( Death due to JCB accident ) समोर आले. याबाबत इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे ( DySP Krushnkant Pingale ) म्हणाले, की अपघाताच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. हर्षवर्धन याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू जेसीबीच्या चाकाखाली डोके आल्याने झाला आहे.

शाळकरी मुलगा ठार
शाळकरी मुलगा ठार

सांगली - जेसीबी खाली चिरडून एक शाळकरी मुलगा ठार ( schoolboy killed in Sangli ) झाला आहे. रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या अवस्थेमध्ये जेसीबी डोक्यावरून गेल्याने ही घटना घडली आहे. इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास करत जेसीबीच्या चालकाला ( Islampur Police arrest driver ) अटक केली आहे. हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.

अर्धी कवटी गायब असलेला मृतदेह सापडला !
सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर ( Accident on Waghwadi to Islampur road ) अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात. या दगड काम करणाऱ्यामधील तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. झोपलेल्या स्थितीमध्ये आज सकाळी एका मुलाचा मृतदेह मिळल्याने एकच खळबळ माजली आहे. हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. धक्कादायक बाब अर्धी कवटी घटनास्थळाहून गायब असल्याची बाब निदर्शनास आली. विशेष बाब म्हणजे हर्षवर्धनच्या आजूबाजूला झोपणारी दोघेजण सुरक्षित होते. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेमुळे उलट-सुलट चर्चा सुरू होती.

हेही वाचा-Shocking News : 11 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

जेसीबीच्या चाकाखाली येऊन मृत्यू
घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केला. जेसीबीच्या चाकाखाली येऊन हर्षवर्धनचे डोके फुटून हा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात ( Death due to JCB accident ) समोर आले. याबाबत इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे ( DySP Krushnkant Pingale ) म्हणाले, की अपघाताच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे.या रस्त्याशेजारी तीन मुले झोपली होती. त्यामध्ये हर्षवर्धन याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू जेसीबीच्या चाकाखाली डोके आल्याने झाला आहे. याप्रकरणी या रस्त्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या जेसीबी चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. जेसीबी मागे घेत असताना हा अपघात घडला. अर्धी कवटी फुटून तिचा चुरा झाला आहे. घटनेनंतर चालकाने पळ काढला होता, अशी माहिती पिंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा-Most Wanted Criminal : भोईवाडा पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या, साथीदारासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.