सांगली - विविध मागण्यांसाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज राष्ट्रव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
ईव्हीएम मशीनमधील गडबड विरोधात, १० टक्के असंवैधानिक आरक्षण रद्द करावे, १३ टक्के रोस्टर पद्धत बंद करावी यासह विविध मागण्यांसाठी आज संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने देशव्यापी भारत बंदची हाक आज देण्यात आली आहे. या बंदला पाठींबा देण्यासाठी सांगलीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. संविधान बदलण्यात घाट घातला जात असून केंद्र सरकारकडून पुरातन काळातील वर्ण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.