ETV Bharat / state

अखेर सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींनी दिले राजीनामे

author img

By

Published : Nov 3, 2021, 7:08 PM IST

Updated : Nov 3, 2021, 10:00 PM IST

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अखेर प्राजक्ता कोरे यांच्यासह उपाध्यक्ष आणि सभापती यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आपले राजीनाने सादर केले आहेत.

Sangli Zilla Parishad
सांगली जिल्हा परिषद

सांगली - सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अखेर प्राजक्ता कोरे यांच्यासह उपाध्यक्ष आणि सभापती यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आपले राजीनाने सादर केले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्ये नवा अध्यक्ष कोण होणार? सत्ताधारी भाजप आता नव्या अध्यक्ष निवडीबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अखेर अध्यक्षांचा राजीनामा -

हेही वाचा - धक्कादायक : गर्भवती पत्नीला पतीने रॉकेल ओतून जाळले; बाळाचा पोटातच मृत्यू, पत्नी गंभीर

सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदाचे राजीनामे घेण्याबाबत भाजप पक्षाकडून संबंधित पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष व सभापतींनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. अखेर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. तर उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आणि इतर चार सभापती यांनीही आपले राजीनामे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सादर केले आहेत, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यासाठी हा बदल भाजपच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्ये नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती कोण? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

नव्या निवडीबाबत भाजपची सावध भूमिका -

सांगली महापालिकेच्या महापौर निवडीत काँग्रेस आघाडीने भाजपचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतर होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजपकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती बदलाबाबत सावध भूमिका घेण्यात आली होती. मात्र, पक्षाकडून आदेश आल्याने आणि सदस्यांमध्ये असलेली नाराजी, यामुळे जिल्हा भाजपच्यावतीने पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या निवडीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजपाच्या सत्तेला महापालिकेप्रमाणे सुरुंग लावणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा - आर्यन खान केस प्रकरणी सॅम डिसूझाची मुंबई हायकोर्टात धाव

Last Updated : Nov 3, 2021, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.