सांगली - सांगली पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे. विवेक भोरे असे या चोरट्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडून चोरीतील चार मोटासायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तासगाव मध्ये गस्त सुरू असताना चोरास पकडण्यात आले.
तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे एक संशयित व्यक्ती चोरीतील मोटरसायकल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर पोलीस पथकाने तातडीने चिंचणीमध्ये पोहोचत सावर्डे रोड येथे थांबलेल्या विवेक भोरे (वय-२७) या तरुणास ताब्यात घेतले व चौकशी केली. संबंधित गाडी त्याने सांगलीच्या गणेश मार्केट येथून चोरून आणल्याची कबुली दिली. यानंतर भोरे यास अटक करून अधिक चौकशी केली असता, सांगली आणि मिरज शहरातून आणखी ३ मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.
चोरीच्या मोटारसायकली पोलिसांकडून हस्तगत-
स्प्लेंडर, शाईन, पल्सर या दुचाकींचा समावेश आहे. चोरट्याकडून सांगली आणि मिरजेतील ४ गुन्हे उघडकीस आले. २ लाख ३० हजार किमतीच्या ४ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे.