सांगली - जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना मृत्यूचा कहर झाला आहे. दिवसभरात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५६ नवे कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ९२ जणांचा समावेश आहे. तर दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक १३८ रुग्ण कोरोना मुक्त झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ४४३ झाली आहे. एकूण आकडा २ हजार ७९९ झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा कहर झाला आहे. दिवसभरात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये, सांगली शहरातील ६ , मिरज शहर १, बेडग १, बुधगाव २, तासगाव १,आणि जत तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे.
दिवसभरात जिल्ह्यात १५६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रात अधिक कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या मध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ९२ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील ७३ आणि मिरज शहरातील १९ जणांचा समावेश आहे.
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये मिरज वंटमुरे कॉर्नर, अमननगर, खतीबनगर, पंढरपूर रोड ,सांगली गणेश नगर, कोल्हापूर रोड पवार प्लॉट, रुक्मिणी नगर, वखारभाग , हडको कॉलनी, पत्रकार नगर, हसनी आश्रमजवळ, सूर्यवंशी प्लॉट, संजयनगर, खनभाग, , विश्रामबाग, मिरज जीएमसी हॉस्टेल, विजयनगर, कोल्हापूर रोड, मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड , चांदणी चौक , सांगली वाडी, गावभाग आदी भागातील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण - आटपाडी तालुका - ०३ ,जत तालुका - ०२,क.महांकाळ तालुका - ११ ,
मिरज तालुका - १९, वाळवा तालुका - ०१ , तासगांव तालुका - १७ ,शिराळा तालुका -०३,कडेगाव तालुका -०७ , खानापूर तालुका- ०१.
उपचार घेणारे तब्बल १३८ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोना उपचार घेणारे ९६ जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील ७५ जण हे ऑक्सिजनवर तर २१ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर १ जण इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
शुक्रवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण व कोरोना मुक्त, त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १,४४३ झाली आहे.तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण २,७९९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यापैकी आज पर्यंत १,२६६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर ९० जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.