सांगली - दोन वर्षाच्या मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर आई-वडिलांनी ( Sangli suicide ) देखील गळफास घेऊन आत्महत्या ( suicide ) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी ( Husband wife suicide in Rajewadi ) येथे एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. किरण हेडगे आणि शितल हेडगे असे या दांपत्याचे नाव आहे. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.
हृदय हेलावून टाकणारी घटना - आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी या ठिकाणी हृदय हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे.आपल्या दोन वर्षाच्या मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे व्यथीत झालेल्या आई-वडिलांनी स्वतःचाही जीव संपून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. किरण हेडगे, (वय 28 )आणि शितल हेडगे, (वय 22) असे या आई-वडिलांचे नावे आहे. राजेवाडी या ठिकाणी हेडगे दांम्पत्य राहते, त्यांना दोन वर्षाची मुलगी होती. मात्र 3 ते 4 दिवसांपूर्वी मुलीच्या घशामध्ये खाण्याचे पदार्थ अडकला होता. त्यानंतर तीचा तडफडून मृत्यू मृत्य झाला होता.
एकाच दोरीने या पती-पत्नीने घेतला गळफास - मुलीचा मृत्य झाल्याची घटना आई-वडिलांच्या जिव्हारी लागल्यामुळे हेडगे दांम्पत्याने आत्महत्या केली आहे. गावातील काणबुनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झाडाला एकाच दोरीने या पती-पत्नीने गळफास घेऊन आपला जीवन संपवले आहे. या घटनेची माहिती मिळतात आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी या दांम्पत्याकडे एक चिठ्ठी आढळून आली, ज्यामध्ये आपल्या मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नसल्याने आम्ही दोघेही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही,असा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे पोलिसांच्या कडून सांगण्यात आलेआहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झालेली आहे. दरम्यान मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.