ETV Bharat / state

पूर पट्ट्यातील नागरिकांनो सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.. सांगलीच्या उपायुक्तांचे आवाहन

वर्षीचा संभाव्य धोका आणि नुकसान टाळण्यासाठी सांगली महापालिका प्रशासनाने पुर पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आज (बुधवार) खुद्द महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी शहरातील पुर पट्ट्यात जाऊन नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या आहेत.

Sangli city Possible flooding zone
सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडून पुरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सुचना
author img

By

Published : Jun 17, 2020, 8:39 PM IST

सांगली - मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये, यासाठी सांगली महापालिकेकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. यावर्षीचा संभाव्य धोका आणि नुकसान टाळण्यासाठी सांगली महापालिका प्रशासनाने पुर पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आज (बुधवार) खुद्द महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी शहरातील पुर पट्ट्यात जाऊन नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षी महापूर आला होता आणि त्याचा मोठा फटका सांगली शहराला बसला होता. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता, पालिका प्रशासनाने पावसाळा सुरू झाल्याने पुरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडून पुरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सुचना...

हेही वाचा... 'हमे बिमारी से लढना है, बिमार से नही', नागरिकांनी भीती ना बाळगता कॉलनीत कोरोनाबाधिताची केली व्यवस्था

दोन महिन्यांपूर्वी देखील सदर ठिकाणच्या नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच इतरत्र तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतरीत होण्याचे सांगण्यात आले होते.

गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्यात विशेषतः सातारा जिल्ह्यात मान्सून पाऊस सक्रीय झालेला आहे. हे लक्षात घेऊन सांगली महापालिका प्रशासनाने आता पूर पट्ट्यातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यास सुरू केले आहे. आज (बुधवार) महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह शहरातील जामावडी, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी या पुरपट्ट्यात जाऊन नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि आतापासूनच आपल्या कुटुंबासह संसारसाहित्य घेऊन स्थलांतरीत व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.