ETV Bharat / state

इंग्लंडहून परतलेले पाच प्रवासी गायब; आरोग्य प्रशासनाला फुटला घाम..! - सांगली कोरोना अपडेट

इंग्लंडहून सांगली जिल्ह्यात 31 प्रवासी परतले आहेत. यामधील 26 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, उर्वरित पाच प्रवाशांचा थांगपत्ता लागत नाही, सदर प्रवाशांचा मोबाईलही बंद लागत असून ते प्रवाशी कर्नाटकात गेल्याची माहिती समोर आल्याने गोंधळ उडाला आहे.

सांगली
सांगली
author img

By

Published : Dec 30, 2020, 6:58 PM IST

सांगली - इंग्लंडहून सांगली जिल्ह्यात 31 प्रवासी परतले आहेत. यामधील 26 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, उर्वरित पाच प्रवाशांचा थांगपत्ता लागत नाही, सदर प्रवाशांचा मोबाईलही बंद लागत असून ते प्रवाशी कर्नाटकात गेल्याची माहिती समोर आल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाला धडकी भरली आहे.

सांगली

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडहून देशात परतलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. त्याशिवाय त्या प्रवाशांची त्यांच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा-पुन्हा चाचणी आणि आरोग्याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या कालावधीत 31 प्रवासी आले आहेत. त्यांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून राज्याच्या आरोग्य संचालक कार्यालयाला आली आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तींचे नाव, पत्ते, जिल्हा आरोग्य यंत्रणेला उपलब्ध झाले आहेत. ज्यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 18 आणि महापालिका क्षेत्रातील 13 प्रवाशांचा समावेश आहे. सदर प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे जिल्हा आणि पालिका आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 14 प्रवासी आणि त्यांच्या 38 नातेवाईकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले, तर इतर 12 आणि त्यांच्या नातेवाईकांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.
इंग्लंडचे पाच प्रवाशी गायब, प्रशासनाला फुटला घाम..
मात्र, यापैकी पाच प्रवाशी जिल्ह्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून इंग्लंडहून आलेल्या 'त्या' पाच प्रवाशांचा शोध आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येते आहे. तर त्या सर्वांचे मोबाईलही बंद येत आहेत. त्यामुळे युद्ध पातळीवर प्रवाशांचा शोध घेण्यात येत असून संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांकडून ते सर्वजण कर्नाटकमध्ये गेल्याची माहिती समोर आल्याचे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.