ETV Bharat / state

सांगली : वयोवृद्ध सोने कारागिराची आत्महत्या, 8 सराफ व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल - सोने कारागिराची आत्महत्या प्रकरणी ८ सोने व्यापाऱ्यावर गुन्हा न्यूज

पैशांच्या तगाद्यामुळे हरीचंद्र नारायण खेडकर या सोने कारागीर वृद्धाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सांगलीच्या 8 सराफ व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

sangli 82 year old goldsmith commits suicide case fir filed against 8 gold traders
सांगली : वयोवृद्ध सोने कारागिराची आत्महत्या, 8 सराफा व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल
author img

By

Published : Feb 11, 2021, 10:29 AM IST

सांगली - पैशांच्या तगाद्यामुळे एका सोने कारागीर वृद्धाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी सांगलीच्या 8 सराफ व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

हरीचंद्र नारायण खेडेकर (वय 82) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी खेडेकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यात फसवणूक, धमकी आणि आर्थिक नुकसान, मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक अजय सिंदकर अधिक माहिती देताना...

काय आहे प्रकरण

सांगली शहरातील वयोवृद्ध हरीचंद्र खेडेकर यांनी 7 फेब्रुवारी रोजी हरभट रोडवरील सराफ दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्येपूर्वी खेडकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये खेडेकर यांनी आपण फसवणूक, सावकारी, आर्थिक नुकसान, धमकी यास कंटाळून आणि मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला होता.

या सराफांविरोधात गुन्हे दाखल...

मधुकर खेडेकर, श्रीकांत खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजु शिरवटकर, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार आणि सुनिल पंडित या सराफांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि सावकारी कायदा अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

हेही वाचा - सांगलीतील कवठे पिरान गावचा कारभार पती-पत्नीच्या हाती

हेही वाचा - मिरज तालुक्यातील लोकेश सुतार टोळीवर तडीपारीची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.