ETV Bharat / state

फुकट घ्या फुकट.. ढबू मिरची फुकट, दर नसल्याने शेतकऱ्याने ढोबळी मिरची वाटली फुकट - ढोबळी मिरचीचे उत्पादन

कुंभारगाव या ठिकाणी भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तालुक्यातले भाजीपाल्यांचे माहेरघर म्हणून याची ओळख आहे. येथील भीमराव साळुंखे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहेत. गेल्या वर्षभरापर्यंत त्यांना ढोबळी मिरची विक्रीतून बऱ्या पैकी नफा मिळाला आहे. त्यांची मिरची मुंबई-पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. कमी-अधिक प्रमाणात त्यांच्या मिरचीला दर मिळत होता.

फुकट घ्या फुकट..
फुकट घ्या फुकट..
author img

By

Published : Aug 23, 2021, 2:26 PM IST

Updated : Aug 23, 2021, 3:10 PM IST

सांगली - फुकट घ्या फुकट.. ढबू मिरची घ्या ढबु मिरची.. फुकट.. फुकट.. फुकट.. असा आवाज गेल्या दिवसांपासून कुंडल परिसरात घुमत आहे. हा कोण्या एखाद्या व्यापाऱ्याचा आवाज नाही, तर ही येथील हवालदील झालेल्या शेतकऱ्याची आर्त हाक आहे. सध्या बाजारात ढोबळी मिरचीचे(शिमला) दर पडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने चक्क ट्रॅक्टर मधून शिमला मिरची फुकट वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. दर कोसळल्याने भीमराव साळुंखे या शेतकऱ्यावर ही घाम गाळून पिकवलेला माल फूकट वाटण्याची वेळ आली आहे.

दर नसल्याने शेतकऱ्याने ढोबळी मिरची वाटली फुकट
दर नसल्याने ढोबळी मिरची फुकट वाटण्याची वेळ..पलूस तालुक्यातल्या कुंभारगाव या ठिकाणी भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तालुक्यातले भाजीपाल्यांचे माहेरघर म्हणून याची ओळख आहे. येथील भीमराव साळुंखे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहेत. गेल्या वर्षभरापर्यंत त्यांना ढोबळी मिरची विक्रीतून बऱ्या पैकी नफा मिळाला आहे. त्यांची मिरची मुंबई-पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. कमी-अधिक प्रमाणात त्यांच्या मिरचीला दर मिळत होता.

सांळुखे यांच्या मिरचीला 9 रूपये किलो दर मिळायचा. त्यात 6 रुपये खर्च वजा होत 3 रुपये पर्यंत नफा मिळत. मात्र आता या शिमला मिरचीचे दर पाच रुपयांच्या खाली पोहोचलेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साळुंखे यांना मिरची आणू नका,असा सल्ला दिला. मात्र पिकवलेल्या मिरचीचे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. आता शेतात तोडणीसाठी आलेली डबल मिरची करायची काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. मिरचीचे झाड जगवायची असेल तर तोड हा केलाच पाहिजे, मात्र ही तोड केलेली ढबु मिरची बाजारात विक्रीसाठी घेऊन जायचं, तर तो खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे साळुंखे यांनी मिरची थेट फुकट वाटण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये ढब्बू मिरची भरून गेल्या दोन दिवसांपासून गावा-गावात मोफत वाटत आहेत.

एकालाही दिसली नाही शेतकऱ्याची वेदना...

सुरुवातीला नागरिकांना ढबु मिरची विक्रीसाठी असल्याचे वाटलं, त्यामुळे कोणी फारसे फिरकले नाही. पण नंतर फुकट असल्याची हाक कानावर पडताचे नागरिकांनी ढोबळी मिरची घेण्यासाठी तोबा गर्दी केली. बघता बघता ढोबळी मिरचीचा भरलेला ट्रॅक्टर काही वेळात रिकामा झाला. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत वाटप सुरू असताना एकाही नागरिकाला, त्या शेतकऱ्याची वेदना दिसून आली नाही, किंवा एकानेही पैसे देऊ का? अशी विचारणा देखील केली नसल्याचे यावेळी दिसून आले.

हेही वाचा - रक्षाबंधन : सांगलीत वृक्ष संवर्धन-संरक्षणासाठी "भगिनी रक्षणम्" कार्यक्रम

Last Updated : Aug 23, 2021, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.