सांगली- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. सहाशे ते साडेसहाशे रुपये प्रति किलो दराने मटण विकले जात आहे. सांगलीतल्या एका मटण विक्रेत्याने 500 रुपये किलोने मटण विक्री सुरू केली आहे. मात्र, सर्वसामान्य खवय्यांना हे दर परवडणारे नाहीत.
सध्या सगळीकडेच मटणाचे दर वाढले आहेत. कुठे सहाशे तर कुठे साडेसहाशे रुपये दराने मटणाची विक्री होत आहे. मात्र, ही किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक नागरिकांनी मटण खरेदीकडे पाठ फिरवली.
यातच गणेश नगर येथील एका मटण विक्रेत्याने मटणाचे दर कमी केले असून तो 500 रुपये किलो प्रमाणे मटण विक्री करतो आहे. हे दर इतर विक्रेत्यांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे खवय्ये या दुकानासमोर गर्दी करताना दिसत आहेत.
मटण विक्रेत्यांनी सातशे रुपये किलो दराने विक्री सुरू केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मागीत काही दिवसांत नागरिकांना आंदोलनही केले होते. या वादानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रशासनाने मटण विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, तरीही मटणाचे दर फार कमी झाले नव्हते.