सांगली - खानापूर विधानसभा मतदारसंघातील ही विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत असाच पाऊस होता. कपबशीच निवडणुकीत चिन्ह होते आणि आताही या दोन्ही गोष्टी आपल्यासोबतच आहेत. 2004 ची पुनरावृत्ती या निवडणूकीत होईल, असा योगायोग आहे. त्यामुळे मतदारसंघातील अपप्रवृत्तींना थांबविण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण राजकारणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी या निवडणुकीत जनतेने मला साथ द्यावी, असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले.
माझ्या मनामध्ये असणार्या सर्व कामांना न्याय मिळावा. यासाठी ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यासाठीच तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन खानापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले.
हेही वाचा - भाजपच्या मनात 'पेशवाई' - सचिन सावंत
विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर लकडे, रामराव पाटील, अशोकराव गायकवाड, विनायक पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, माजी सभापती सुशांत देवकर, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, युवा नेते राजूशेठ जानकर, नितीनराजे जाधव, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - पिस्तुल तस्कर गजाआड; 5 पिस्तुल, 15 जिवंत काडतुसांसह 5 मॅगझीन जप्त