ETV Bharat / state

..तर सदाभाऊ राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेल! - sadabhau khot speaks on raju shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद संपण्याची आशा सदाभाऊंनी केलेल्या वक्तव्याने जागृत झाली आहे.

sadabhau khot news
..तर सदाभाऊ राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेल!
author img

By

Published : Nov 16, 2020, 5:05 PM IST

Updated : Nov 16, 2020, 7:05 PM IST

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी नेते सदाभाऊ खोत यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना साद घातली आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले, तर सदाभाऊ खोत निश्चितपणाने त्यांच्या खांद्याला खांदा लावेल, असे ते म्हणाले. राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नाही, असे वक्तव्य करत त्यांनी भाजपावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

राजू शेट्टींनी लुटारूंची संगत सोडली, तर निश्चितपणाने राजू शेट्टींसोबत काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी एकत्र काम करणारे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांमधील वाद चव्हाट्यावर आले. यातून सदाभाऊ खोत यांनी भाजपाचा रस्ता धरला, तर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतच राहण्याचे ठरवले. यानंतर दोघांमधील वाद काहीना काही कारणांनी बाहेर येत होते. मात्र आता खोत यांनी राजू शेट्टींना साद घातली आहे. राज्यातील साखर सम्राटांविरोधात दंड थोपटत त्यांनी शेट्टी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

भविष्काळात शेतकऱ्यांच्या, उसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल, तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न ?

पदवीधर निवडणुकांआधी सदाभाऊ खोत यांचा भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राजू शेट्टी संतापले ... "हे तर पुतना मावशीचे प्रेम"

शेट्टी म्हणाले, ज्यांना समिती नेमून संघटनेतून हाकलून दिले अशा लोकांना पुन्हा संघटनेत घेण्याची इच्छाच नाही. ज्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही कळवळा व्यक्त केला आहे, त्या शेतकऱ्यांचे कडकनाथ घोटाळ्यातील पैसे परत करा, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. केवळ पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, ज्या पक्षात ते सध्या आहेत, तिथूनच काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. म्हणून काहीतरी बोलत असतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

Last Updated : Nov 16, 2020, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.