ETV Bharat / state

महाविकास आघाडीकडून जिरवा-जिरवीचे राजकारण - खोत - सांगली लेटेस्ट न्यूज

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जिरवा-जिरवीचे राजकारण आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कवठेपिरानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांची जयंती

author img

By

Published : Feb 14, 2021, 4:03 PM IST

सांगली - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जिरवा-जिरवीचे राजकारण आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कवठेपिरानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांची जयंती

हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त पैलवान भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांच्या वतीने हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धचे उद्घाटन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. त्यानिमित्ताने कवठेपिरान ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी निवड झालेले पती-पत्नी भीमराव माने आणि अनिता माने यांचा जाहीर सत्कारही यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.

राज्यात जिरवा-जिरवीचे राजकारण

आयोजित समारंभात बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, आज राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून केवळ राजकारण करण्यात येत आहे, तसेच यातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचेही त्यांनी म्हटले.

पडळकरांचे मंत्रीपद निश्चित

पुढे बोलताना खोत म्हणाले की, राज्यात गोपीचंद पडळकर यांना चांगलंच ओळखलं जात आहे. पडळकर टीव्हीवर आले की, आज ते कोणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोक टीव्हीसमोर बसतात. त्यामुळे आता पडळकर यांचे मंत्रीपद निश्चित आहे. कारण गोपीचंद पडळकर यांना सध्या महाराष्ट्रामध्ये जास्त टीआरपी असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

महाविकास आघाडीकडून जिरवा-जिरवीचे राजकारण

बंदी असताना प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात जाणं गरजेचं होतं

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर राष्ट्रवादीने मला महाराष्ट्रात बंदी करू, फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. अशा परिस्थितीत कवठेपिरानमध्ये कार्यक्रमला जाणे गरजेचे होते, जरी तो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ असला तरी मी इथे आले आहे. कारण ज्या कुटुंबाचा हा कार्यक्रम पार पडतोय, त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष वगैरे अशी पद ही किरकोळ आहेत, असा टोला यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना यावेळी लगावला.

पडळकर आणि खोतांमध्ये रंगला सामना

हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटनच्या निमित्ताने आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मैदानात उतरून थेट हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला, काहीवेळ याठिकाणी आमदार खोत आणि पडळकर यांच्यामध्ये हॉलीबॉलचा सामना रंगला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.