सांगली - महापुरामुळे बनलेल्या भीषण परिस्थितीचा सामना करायला प्रशासनाला उशीर झाला, अशी कबुली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. सांगलीवाडी येथे अडकलेल्या पुरग्रस्तांना सोडवण्यासाठी खोत हे सांगली शहरात आले होते. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली.
सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या महापुरात खोत गेले ४ दिवसांपासून नागरिकांना बाहेर काढण्याचे त्यांना मदत पोहोचण्याचे काम करत आहेत. ते आज पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरात आले असता ही पूरपरिस्थिती हातळण्यासाठी प्रशासनाला जरा उशीर झाला, असे ते म्हटले. मात्र, आता युद्धपातळीवर नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच इतर नागरिकांनीही पुरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.