सांगली - जिल्हा परिषदेच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरून वादंग झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्यांचा गोंधळ
सांगली जिल्हा परिषदेच्या महासभेत पार पडली आहे. मात्र प्रचंड गदारोळात ही महासभा पार पडली आहे. सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जिल्हा परिषद सदस्यांनी गदारोळ घातला आहे. यावेळी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेडवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
'यामुळे' निर्माण झाला आहे वाद
26 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्या परिषदेची महासभा पार पडली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची शिफारशीनुसार कामांचे वाटप करण्याचा ठराव करण्यात आल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी हा ठराव बेकायदेशीर ठराव असल्याचा ठपका ठेवत थेट जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा प्रस्ताव तयार करत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला होता. या मुद्द्यावरून जिल्हा परिषद सदस्य व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या संघर्ष उफाळून आला.
गुडेवारांविरोधात सर्व सदस्य आक्रमक
दरम्यान या ठरावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा परिषदेची महासभा आयोजित करण्यात आली. हा सभेत जिल्हा परिषद बरखास्तीबाबत प्रोसेडिंग सुरू झाल्याने, सत्ताधाऱ्यांसह विरोधी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. त्यांना संतप्त सदस्यांनी धारेवर धरले. यावेळी काही सदस्यांनी गुडेवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत अधिकारी हटाव, जिल्हा परिषद बचाव अशी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.