ETV Bharat / state

sangli News : आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, गाठ थेट रोहित पाटलांशी असेल - रोहित आर.आर.पाटील

आबांच्या कार्यकर्त्याला जर हात लागणार असेल तर गाठ थेट रोहित पाटलाशी असेल,असा खणखणीत इशारा स्वर्गीय आर.आर.पाटील यांची सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर.आर. पाटील यांनी दिला आहे. तसेच ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, त्यामुळे आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, असा सज्जड दम देखील रोहित पाटलांनी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांना अप्रत्यक्षरीत्या दिला आहे, ते तासगावच्या मणेराजुरी येथे बोलत होते.

Rohit RR Patil
रोहित आर.आर.पाटील
author img

By

Published : Jan 21, 2023, 12:53 PM IST

सांगलीत भाजप खासदार संजय काका पाटील यांना रोहित पाटलांचा इशारा

सांगली : तालुक्यातील मनेराजुरी या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याहस्ते यावेळी हा सत्कार संपन्न झाला, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील यांच्यासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आबांच्या विचारांचा वारसदार : यावेळी बोलताना रोहित आर.आर.पाटील यांचा आक्रमक बाणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, या मतदारसंघांमध्ये आबांचा मुलगा म्हणून केवळ रक्ताचा वारसदार म्हणून नव्हे तर आबांच्या विचारांचा वारसदार म्हणून आपण वावरत आहोत,सर्वसामान्य जनतेला अधिक सुविधा देण्यासाठी आपले काम आबांच्या विचारनुसार आहे.तसेच काँग्रेस पार्टी वाढवण्याचे काम या ठिकाणी सुरू, 2017 मध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 55 ग्रामपंचायत पैकी 12 ते 13 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या होत्या,मात्र यंदा 55 पैकी 35 हुन अधिक ग्रामपंचायती या राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.आणि या पुढच्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि या मतदारसंघातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नंबरचा पक्ष असेल,असा विश्वास ही यावेळी रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीसाठी तुम्ही मुख्यमंत्री : तसेच अजित दादा तुम्ही राज्यांसाठी "दादा"असाल पण आमच्या तालुक्यासाठी तुम्ही "आबा"आहात आणि या मतदारसंघाचे नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्नशील राहिला आहात आज जरी तुम्ही विरोधी पक्षनेते असाल पण आमच्यासाठी राष्ट्रवादीसाठी तुम्ही मुख्यमंत्री आहात, असे गौरव उद्गार देखील रोहित पाटील यांनी काढले आहेत.

आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत : आपल्या भाषणामध्ये बोलताना काही कार्यकर्त्यांनी विरोधकांच्याकडून होणाऱ्या दमदाटीचा धागा पकडत बोलताना रोहित पाटील म्हणाले, तालुक्यामध्ये होणाऱ्या एमआयडीसी बाबत गैरसमज पसरवले जातात. पण कोणतेही प्रदूषण होईल अशी इंडस्ट्री या ठिकाणी येणार नाही,असे स्पष्ट करत यावरून विरोधकांच्याकडून दमदाटी देखील केली जात आहे. पण माझे त्यांना सांगणं आहे,' ज्या गावच्या बोरी,त्या गावच्या बाभळी असतात' आणि आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील आर आर आबा असतील आणि महाराष्ट्राच्या संस्कृती जपण्यासाठी आमचा प्रयत्न असेल पण आबांच्या कार्यकर्त्यांना जर कोणी हात लावणार असेल तर थेट गाठ रोहित पाटलांची आहे,हे देखील लक्षात ठेवावे,असा इशारा रोहित आर आर पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या नाव न घेता, भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांना दिला आहे.

हेही वाचा : Jayant Patil on BJP जयंत पाटलांची भाजपवर टीका म्हणाले भाजपकडून सत्तेचा गैरवापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.