ETV Bharat / state

Kavathe Mahankal Nagar Panchayat Election : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता येईल - रोहित पाटील - कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता

राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Nagarpanchayat election) आज मतदान होत आहे. कवठेमहांकाळच्या जनतेला शहराचा विकास हवा आहे, त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये (Kavathe Mahankal Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Rohit  Patil
Rohit Patil
author img

By

Published : Dec 21, 2021, 3:21 PM IST

Updated : Dec 21, 2021, 3:31 PM IST

सांगली - कवठेमहांकाळच्या जनतेला शहराचा विकास हवा आहे, त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये (Kavathe Mahankal Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच विजय होईल, (Rohit Patil on Kavathe Mahankal Nagar Panchayat Election) असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते नगरपंचायत निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळमध्ये बोलत होते.

विजय राष्ट्रवादीचा होणार..!

संपूर्ण राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत, यामध्ये सगळ्यात चर्चेची निवडणूक ठरली ती कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक. (Kavathe Mahankal Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित आर. आर. पाटील(Rohit Patil son of R.R. Patil) यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक लढवलेली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या या प्रचारामध्ये रोहित पाटील यांनी विरोधकांच्यावर केलेल्या घणाघात टिकेनंतर ही निवडणूक चर्चेत आली. आज या नगरपंचायतीसाठी मतदान पार पडत असून 100% राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना रोहित आर आर पाटील

राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका -

राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Nagarpanchayat election ) 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची 07 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. राज्यात महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस असे तीन पक्ष एकत्र असताना स्थानिक पातळीवर मात्र कुठे युती तर कुठे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Last Updated : Dec 21, 2021, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.