ETV Bharat / state

"उमेदवारीसाठी सेनेचा शिवधनुष्य उचलणाऱ्यांना निकालानंतर वनवासाला जावे लागणार" - NCP Maharashtra

सांगलीच्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. तासगावच्या ढवळी येथे रविवारी सुमनताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा झाला.

"उमेदवारीसाठी सेनेचा शिवधनुष्य उचलणाऱ्यांना निकालानंतर वनवासाला जावे लागणार"
author img

By

Published : Oct 7, 2019, 6:52 AM IST

सांगली - तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवधनुष्य उचलणाऱ्यांना 24 तारखेनंतर वनवासात जावे लागणार, असा गर्भित इशारा आर. आर. पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सेनेचे उमेदवार माजी मंत्री अजित घोरपडे यांना दिला आहे. तासगावच्या ढवळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

"उमेदवारीसाठी सेनेचा शिवधनुष्य उचलणाऱ्यांना निकालानंतर वनवासाला जावे लागणार"

हेही वाचा - 'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात

सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे. तासगावच्या ढवळी येथे रविवारी सुमनताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा झाला. याप्रसंगी आमदार सुमनताई पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आर. आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील सांभाळत आहेत. या प्रचार शुभारंभानिमित्त ढवळी गावातून रोहित पाटील यांची ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी घेतली विक्रमगडमधील 'बंडोबां'ची भेट

यानंतर आयोजित जाहीर सभेत रोहित पाटील यांनी धडाकेबाज भाषण करत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. आबांचे विचार घेऊन विकासाचा डोंगर या मतदारसंघात उभा केला आहे. त्यामुळे जनता पुन्हा साथ देईल, असा विश्वास व्यक्त करत या मतदारसंघातुन शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर जोरदार निशाण साधला. सत्ता आणि आमदारकीसाठी कधी काँग्रेस, कधी अपक्ष, कधी राष्ट्रवादी, कधी विकास आघाडी, कधी भाजप असे पक्ष बदलले, आणि आता शेवटचा रहिलेल्या शिवसेनेत जाऊन उमेदवारीसाठी शिवधनुष्य उचलला आहे. मात्र, जनतेने हातात घेतलेल्या या निवडणुकीत 24 तारखेच्या निकालानंतर शिवधनुष्य घेऊन वनवासाला जावे लागणार असा गर्भित इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे.

Intro:File name - mh_sng_01_rohit_patil_on_x_minister_vis_01_7203751 - mh_sng_01_rohit_patil_on_x_minister_byt_04_7203751

स्लग - उमेदवारीसाठी सेनेचा शिवधनुष्य उचलणारयांना निकालानंतर वनवासाला जावे लागणार,आबांच्या मुलाचा माजी मंत्र्याला इशारा...

अँकर - तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात उमेदवारीसाठी शिवधनुष्य उचलणारयांना 24 तारखे नंतर वनवासात जावे लागणार असा गर्भित इशारा, आर आर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सेनेचे उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना दिला आहे.तासगावच्या ढवळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.Body:सांगलीच्या तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहे.
रविवारी सुमनताई पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तासगावच्या ढवळी येथे पार पडला.याप्रसंगी आमदार सुमनताई पाटील,काँग्रेस युवा नेते विशाल पाटील यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आर आर आबा व सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील सांभाळत आहेत.आणि या प्रचारा शुभारंभ निमित्त ढवळी गावातून रोहित पाटील यांची ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून मिरवणुकी काढली.तर यानंतर आयोजित जाहीर सभेत रोहित पाटील यांनी धडकेबाज भाषण करत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे.आबांचे विचार घेऊन विकासाचा डोंगर या मतदारसंघात उभा केला आहे,त्यामुळे जनता पुन्हा साथ देईल,असा विश्वास व्यक्त करत या मतदारसंघातुन शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर जोरदार निशाण साधला.सत्ते व आमदारकीसाठी कधी काँग्रेस, कधी अपक्ष,कधी राष्ट्रवादी,कधी विकास आघाडी,कधी भाजपा अशे पक्ष बदलले आणि आता शेवटचा रहिलेल्या शिवसेनेत जाऊन उमेदवारीसाठी शिवधनुष्य उचलला आहे.मात्र जनतेने हातात घेतलेल्या या निवडणूकीत 24 तारखेच्या निकालानंतर शिवधनुष्य घेऊन वनवासाला जावे लागणार,असा गर्भित इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे.

बाईट - रोहित आर आर पाटील - युवा नेतेराष्ट्रवादी काँग्रेस.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.