सांगली - विटा शहरातील मायणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाला आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेच्यावतीने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.
रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसैनिक रस्त्यावर -
विटा शहरातली मायणी रस्त्याची हालत अतीशय खराब असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी विटा नगरपालिकेची गाडीदेखील या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये अडकून पडल्याची घटना घडली होती, अशा या सर्व परिस्थितीत विटा नगरपालिकेकडून मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त शिवसेनेने मंगळवारी विटा नगरपालिकेच्या विरोधात आणि रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन केले. तब्बल एक तास या ठिकाणी हा 'रस्ता रोको' करण्यात आला.
बाबर विरुद्ध पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार सदाशिव पाटील यांची विटा नगरपालिकेत सत्ता आहे. परंतु शिवसेना याठिकाणी विरोधात आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी एकत्र असली, तरी नगरपालिकेत मात्र बाबर विरुद्ध पाटील असा पारंपरिक संघर्ष पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- ...तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला नसता का? भाजपचा सरकारला प्रश्न