सांगली - जिल्ह्यातील इस्लामपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच तरूणीला बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी 42 वर्षीय अतुल पाटील याला अटक करण्यात आली आहे.
गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार आणि... -
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अतुल पाटील या व्यक्तीचे पीडित तरुणीच्या घरी जाणे-येणे होते. दोन वर्षांपूर्वी अतुल हा तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी तरुणी घरात एकटी होती. तरुणीला त्यांने बिर्याणी खाऊ घातली आणि त्याने त्या बिर्याणीत गुंगीचे औषध मिळसले होतो. त्यामुळे तरुणी काही काळात बेशुद्ध झाली होती. तरुणी बेशुद्ध झाल्याचा फायदा घेत त्यांने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले.
जाब विचारल्यास दिली धमकी -
तरुणीचे काढलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवून ते व्हायरल करायची धमकी देत तो त्या तरुणीवर बाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करत असे. सतत होत असलेल्या या त्रासाला कंटाळून तरुणीने ही गोष्ट आपल्या आई-वडीलांना सांगितली. त्यांनी अतुल याला जाब विचारला असता त्याने तिचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
न्यायालयाने सुनावली कोठडी -
पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीने दिलेल्या धमकीला न जुमानता इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन अतुल पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - नाशिक परिक्षेत्रात तब्बल चार कोटींचा गांजा, ब्राऊन शुगर, चरसचा साठा जप्त