ETV Bharat / state

'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'

author img

By

Published : Jan 3, 2020, 9:33 PM IST

सांगलीत राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला. राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर जोरदार टीका केली. या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होणार नसून ज्यांनी शेती सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

shetti
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी

सांगली - कर्जमाफीवरून ठाकरे सरकार अनेकांच्या टीकेचे धनी ठरत आहे. 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं', असे होर्डिंग लावले कशाला', असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शहरात आज (3 जानेवारी) राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, असे आवाहन शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी

मेळाव्यात राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर जोरदार टीका केली. या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होणार नसून ज्यांनी शेती सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी; राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

राजू शेट्टी म्हणाले, "गेल्या वर्षी खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेली आहेत. राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि महापूर यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. एकही शेतकरी या नुकसानीपासून वाचू शकला नाही. सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले ते शेतकरी जून 2020ला थकबाकीदार होणार आहेत. सरकारला या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर, शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ केले जावे"

मेळाव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपटराव मोरे, संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:
File name - mh_sng_03_shetti_on_karjmafi_vis_01_7203751 - to - mh_sng_03_shetti_on_karjmafi_byt_04_7203751

स्लग - कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसताना,"करून दाखवलं"होर्डिंग लावली कश्याला - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजू शेट्टींचा टोला...

अँकर - खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसताना,"करून दाखवले"
होर्डिंग लावली कश्याला,असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.तसेच सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन,सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत,गाठ शेतकऱ्यांशी आहे,हे दाखवून द्यावे,असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.सांगली मध्ये आयोजित शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्यात ते बोलत होते.
Body:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगली मध्ये शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,पोपटराव मोरे,संदीप राजोबा यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी वरून बोलताना ,सरकारवर जोरदार टीका केली आहे.सरकारकडून दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे,मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होत नाही.जे आता शेतकरी राहिले नाहीत, ज्यांनी शेती सोडली आहे,त्यांना या योजनेचा फायदा होणार,यामुळे खऱ्या शेतकरयांना जर फायदा होणार नसेल ,तर तुम्ही शेतकरी कर्जमाफी केली,म्हणून "करून दाखवलं"हे होर्डिंग लावली कश्याला ? असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

तसेच गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये सर्व पीके वाया गेले आहेत.राज्यात अतिवृष्टी,अवकाळी, महापूर यामुळे शेतकऱयांचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे.आणि एकही शेतकरी या नुकसानी पासून वाचू शकला नाही, आणि सप्टेंबर मध्ये या शेतकऱ्यांनी कर्जे घेतली आहेत,व ते शेतकरी जून 2020 ला थकबाकीदार होणार आहेत.आणि जर सरकारला या शेतकऱ्यांना दिलासा द्याचा,असेल तर शेतकरयांची चालू पीक कर्ज माफ केली पाहिजे,आणि सरकारच्या कर्जमाफी पासून शेतकरी वंचित राहणार आहे,मात्र हे सरकार समजून घ्यायला तयार नाही,आणि कर्जमाफीमुळे शेतकरी समाधानी झालं आहे ,असे समजत असेल,तर 8 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी भारत बंद आंदोलनात शेतकऱ्यांना सहभागी होऊन या सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत,गाठ शेतकरयांशी आहे,हे दाखवून दिले पाहिजे असं ,आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

बाईट - राजू शेट्टी - माजी खासदार ,स्वाभिमानी शेतकरी संघटना.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.