ETV Bharat / state

Rain Subsided : पावसाचा जोर ओसरला; कृष्णा, वारणा नदीच्या पातळीत घट, मात्र चांदोलीत सहाव्या दिवशीही अतिवृष्टी... - heavy rain continues in Chandoli

पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा, वारणा नद्यांचा पाणी पातळीत थोडी ( Decrease in water level of Krishna rivers ) घट झाली आहे. यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, चांदोली धरण ( Chandoli Dam ) पाणलोट क्षेत्रात स्लग सातव्या दिवशी,ही अतिवृष्टी ( Heavy rain in Chandoli dam ) कायम आहे.

Decrease in the level of river Warna
वारणा नदीच्या पातळीत घट
author img

By

Published : Jul 16, 2022, 7:07 PM IST

सांगली - सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पाऊसाचा जोर आता ओसरला आहे. मात्र चांदोली धरण ( Chandoli Dam ) पाणलोट क्षेत्रात स्लग सातव्या दिवशी,ही अतिवृष्टी ( Heavy rain in Chandoli dam ) कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण 70 टक्के भरले आहे. तर, पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा, वारणा नद्यांचा पाणी पातळीत थोडी ( Decrease in water level of Krishna rivers ) घट झाली आहे.यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.

Decrease in Krishna river level
कृष्णा नदीच्या पातळीत घट

पावसाचा जोर आता ओसरला - गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाऊस संतधार पावसाचा जोर आता ओसरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र, शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच आहे. सलग सहाव्या दिवशी या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. 24 तासांमध्ये 90 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 34.40 टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता 24.18 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे 71 टक्के धरण भरले आहे. त्यामुळे धरणामधून 1हजार 721 क्युसेकस पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे. तर, शिराळा तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी ही पात्र बाहेर पडलेली आहे. मात्र, पावसाचा जोर मंदावल्याने वारा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने घट होत आहे.

हेही वाचा - Face To Face Varsha Gaikwad : मुंबईसह आगामी पालिका निवडणुकांत काँग्रेस जोमात उतरणार - वर्षा गायकवाड

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट - दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होऊन पातळी 18 फुटा झाली होती. पण पाणलोट क्षेत्रातल्या पावसाचा जोर मंदावला असला तरी कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा, वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालेला आहे.

हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.