सांगली - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने नुकतेच दहावीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालात मुली आघाडीवर दिसून आल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाळवा येथील हुतात्मा किसान आहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पुष्पा इंगोले या विद्यार्थिनीने 100 % गुण(500पैकी500) मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या तिच्या उज्ज्वल यशासाठी वाळवा पंचायत समितीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
वाळवा पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील व गटविकास अधिकारी मा शशिकांत शिंदे, उप सभापती नेताजी पाटील, मुख्याद्यापक मधुकर वायदंडे यांच्या हस्ते वाळवा तालुका पंचायत समिततीमध्ये जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
वाळवा येथील पुष्पाने शाळेतील अभ्यासाबरोबर खो खो खेळामध्ये ही प्राविण्य मिळवले आहे. ती नॅशनल खेळाडू असून तिने राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेत सुवर्णं पदक पटकावले आहे. तर वाळवा येथे झालेल्या राज्यस्तरीय खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होतो. तसेच आतापर्यंत पालघर दापोली नाशिक येथे खेळातून पुष्पाने प्रथम क्रमांकाने येऊन आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे.
दहावीच्या परीक्षेत पुष्पाने बाहेरील क्लासेस न लावता हे यश मिळवले आहे. हे यश मिळवून तिने आई-वडील व शाळेचे नाव उज्वल केले आहे. तिने मिळवलेल्या या यशाचा शनिवारी गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यासाठी मा मुख्याद्यापक मधूकर वायदंडे, व मुलीचे आई,वडील व ईतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत हां सत्कार सोहळा संपन्न झाला !