सांगली - मुंबईमध्ये काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्य झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सांगली पोलीस दलाकडून आज 250 पोलीस कर्मचाऱ्यांना पीपीई किट वाटप करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयात रविवारी बंदोस्तात राहणाऱ्या किट वाटप करण्यात आले. पायापासून डोक्यापर्यंत आणि हात मोजे असे सुरक्षेच्या किटचा समावेश आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या पुढाकारातून हे किट पोलिसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
मनीषा डुबुले, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली पोलिसांची काळजी..! सांगली पोलिस दलाकडून २५० पोलीस कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वितरण कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतो, त्याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना सेवा बाजावी लागत आहे. यातून मुंबई येथील काही पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दल अधिक सजग झाले आहे. सांगली जिल्ह्याचे ही अनेक भागात कोणाचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 28 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे सांगली जिल्ह्यात समोर आले आहे. त्या भागात पोलिसांना बंदोबस्तासाठी कार्यरत राहावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट देण्यात आली आहेत.अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या हस्ते या पीपीई किटचे यावेळी वितरण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.