सांगली - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगली जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण पार पडले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दि सांगली बार असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शक्य तिथे वृक्षारोपण करणे गरजेचे -
पर्यावरण संतुलनासाठी झाड हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपन केले पाहिजे. झाड ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जेथे शक्य आहे. तेथे सर्वांनी वड, लिंब, पिंपळ अशी दीर्घायुष्यी झाडे लावावीत. असे आवाहन जिल्हा न्या. विजय पाटील यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश.डी.पी. सातवळेकर, न्या.आर. जगताप, न्या.एस.पी. पोळ, न्या.एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश एल. हुली, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. पराग साने, न्या. मनिषा चव्हाण, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. अंबिका कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. विश्वास माने, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संदीप लवटे आदींनी वृक्षारोपण केले.
हेही वाचा - world environment day मुक्तांगणातील विद्यार्थ्यांनी बनवले तब्बल पाच हजार सीड बॉल