सांगली - मराठा साम्राज्यासाठी लढताना धारतीर्थ पडलेल्या वीरांच्या समाधीस्थळांचे छायाचित्र प्रदर्शन सांगलीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. लढाई करताना मरण पावलेल्या 120 ज्ञात-अज्ञात वीरांच्या समाधीचे छायाचित्रे व इतिहास 'मराठ्यांचे धारतीर्थे' या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. मराठा समाजभवनमध्ये दोन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक
मराठेशाहीच्या वीर योद्ध्यांची समाधी व इतिहास आजच्या पिढीला समजावा, या उद्देशाने सांगलीतील इतिहास संशोधक प्रवीण भोसले व शिवभक्तांनी मिळून 'मराठ्यांचे भारतभर धारतीर्थे' हे छायाचित्रे प्रदर्शन सांगलीमध्ये आयोजित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज स्थापनेपासून मराठाशाहीसाठी अनेक लढाया लढतान वीर मरण आलेल्या 120 वीरांचे समाधी स्थळांचे छायाचित्रे व त्यांचा थोडक्यात इतिहास या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
मराठा छत्रपती, सरदार आणि शूरवीर सैनिकांचा समावेश आहे. तंजावर ते पानिपत आणि बंगाल ते गुजरात अश्या देशातील विविध भागात असणाऱ्या समाधी शोधून या सर्वांचा इतिहास जगासमोर यावा, तसेच वीरांच्या समाधीची जतन आणि जीर्णोद्धार व्हावा म्हणून भोसले यांनी हा उपक्रम राबवला. त्यांनी 30 वर्षांपासून भारत भ्रमण करून चित्रांचे संकलन केले आहे.
हेही वाचा - 'मिसेस फडणवीसांनी आपल्या करियरवर फोकस करावा'